esakal | Nashik Crime | चांदोरीत बनावट दारू कारखान्यावर पोलिसांचा छापा; 1 कोटीचा माल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

police raided a counterfeit liquor factory in chandori nashik Crime News

चांदोरीत बनावट दारू कारखान्यावर पोलिसांचा छापा; 1 कोटीचा माल जप्त

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : औरंगाबाद रोड वर चांदोरी नजीक असलेल्या सुदाम खरात यांच्या उदयनराजे लॉन्स येथे सुरु असलेल्या बनावट दारूच्या कारखानावर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी छापा टाकत लाखो रुपयांचा माल जप्त करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा सुरु असून सुमारे एक कोटी रुपयांचा माल जप्त केल्याची माहिती मिळत आहे.

police raided a counterfeit liquor factory in chandori

police raided a counterfeit liquor factory in chandori

seized goods worth Rs one crore

seized goods worth Rs one crore

चांदोरी (ता. निफाड) शिवारात उदयराजे लॉन्समध्ये अवैधरीत्या बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याबाबतची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. माहितीची खात्री करीत सोमवारी (ता. ११) रात्री अकराच्या सुमारास पोलिस ताफा नेत छापा टाकला. घटनास्थळी संजय मल्हारी दाते (वय ४७, रा. गोंदेगाव, ता. निफाड, जि. नाशिक) मिळून आला. चौकशीत बनावट देशी दारूचे अंदाजे दोन हजार खोके, १५ हजार देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, स्पिरिट अंदाजे २० हजार लिटर, २०० लिटर सुमारे १०० बॅरेल, रिकामी खोकी अंदाजे दहा हजार, देशी दारू बनविण्याचे साहित्य, पाण्याच्या टाक्या पाच व एक ट्रक, असा अंदाजे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. देशी दारू कारखाना अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीच्या उदयराजे लॉन्समध्ये सुरू असल्याचे चौकशीत समजून आले. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा सुरू होता.

loading image
go to top