Nashik Crime: हेल्पलाईनवर तक्रारी येताच, पोलिसांचे जुगार अड्ड्यावर छापे; 25 जुगाऱ्यांविरोधात केले गुन्हे दाखल

 gambling
gamblingsakal

Nashik Crime : शहरातील अवैध धंद्यांसह तक्रारी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने पोलीस कंट्रोल रुमचा हेल्पलाईन क्रमांक जारी केला.

या हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत शहर पोलिसांनी शहरातील जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करीत २५ जुगाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले.

यामुळे शहरात चोरीछुप्यारितीने सुरू असलेल्या जुगार्यांचे धाबे दणाणले आहे. (Police raids gambling dens after receiving complaints on helpline Cases filed against 25 gamblers Nashik Crime)

पंचवटी पोलिसांच्या हद्दीतील इंद्रकुंड भितींलगत जुगार अड्ड्यावर रविवारी (ता. २०) रात्री साडेआठ वाजता छापा टाकण्यात आला. यात लक्ष्मण सुरेश कराटे, विनायक दिगंबर कासार, गणेश बाळु लोणारे, सुशांत मोहन बरडीया (सर्व रा. पंचवटी) या जुगार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

तर, मुंबई नाका पोलिसांनी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वेद मंदिरालगतच्या मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्यांकडून ४ हजार रुपये व साहित्य जप्त करीत, जगदिश रंगनाथ पाटील, दिपक तम्मा धोत्रे (रा. कस्तुरबा नगर), साहेबराव मुकुंद शिंदे, आनंद यशवंत साळुंके (दोघे रा. सिडको), दिलीप शंकर पाटील (पंचवटी) या जुगार्यांविरोधात  गुन्हा दाखल केला.

त्याचप्रमाणे, त्रिमुर्ती चौकात जुगार खेळणाऱ्या ज्ञानेश्वर कृष्णा शिंदे, गजानन रावसाहेब तेलगड, प्रदीप लक्ष्मण पाटील, उमेश दत्ता नखाते यांच्याविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

तर, अंबड एमआयडीसी चौकी पोलिसांनी संजीवनगरमधील जुगार  अड्ड्यावर छापा टाकून, रियासत रुखावत खान, अन्वर उल्लाखान, मोसिन खलील मिर्झा, आसिम रईसमरहुम खान, शेर मोहम्मद खान, आझम अमीन खान, जमाल इर्शाद खान यांच्याविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल केला.

नाशिकरोड हद्दीतही गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने गंगा पाडळी शिवारातील जुगार अड्ड्यावर  कारवाई करीत,  शिवनाथ एकनाथ रुमे, भीमराव सखाराम सुरदुसे, रामदास महादू आहेर, रतनसिंग जाधव, बबन दामू पवार यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 gambling
Nagpur Crime : उपराजधानी हादरली! २४ तासांत दोन खून, दाम्पत्यावर हल्ला

आयुक्तांच्या हेल्पलाईनला प्रतिसाद

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील अवैध धंद्याविरोधात कडक धोरण  अवलंबले आहे. अवैधरित्या सुरू असलेले दारु अड्डे, जुगार, मटका अड्ड्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यांसह स्वतंत्र पथकेही आहेत.

तरीही शहरात छुप्यारितीने जुगार, मटक्याचे अड्डे सुरू असल्याने यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयाच्या कंट्रोल रुमवर स्वतंत्र व्हॉटसॲप हेल्पलाईन क्रमांक ८२६३९९८०६२ सुरू केला आहे.

गेल्या दोन दिवसातच  यावर मोठ्याप्रमाणात तक्रारी आल्याने त्याची गंभीर दखल घेत शहर पोलिसांच्या पथकांनी जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करीत छापे टाकले.

 gambling
Mcoca Crime : पुण्यातील गुन्हेगारांविरुद्ध ‘मोका’चे अर्धशतक; २९७ जणांवर कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com