Nashik Police Recover Stolen Property
sakal
नाशिक: चोरी, घरफोडी, वाहनचोरी, जबरी चोरीच्या गुन्ह्यांत गेलेला मुद्देमाल परत मिळेल याची कोणतीही शाश्वती तक्रारदारांना नसताना, परिमंडळ एक अंतर्गत दाखल ५० गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. या तक्रारदारांना त्यांचा चोरीला गेलेला सुमारे ३९ लाखांचा मुद्देमाल परत त्यांच्या हाती सोपवला आहे. यामुळे अनेक तक्रारदारांच्या चेहऱ्यांवर हास्याची लकेर आणि समाधान झळकले. तर, पोलिसांनाही त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती मिळाली आहे.