नाशिक- गेल्या वर्षी नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात भरती झालेले १०२ अंमलदार हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आयुक्तालयात रुजू झाले आहेत. या १०२ अंमलदाराचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वागत करीत त्यांना मुख्यालयात कर्तव्य न बजाविता थेट पोलिस ठाण्यांमध्ये कर्तव्य बजाविण्याची संधी देणार आहे. त्यामुळे नेहमीच अपुऱ्या मनुष्यबळाची ओरड असलेल्या पोलिस ठाण्यांना यामुळे बळ मिळणार आहे.