Police Recruitment : पोलिस भरती अर्ज दाखल; प्रत्यक्ष प्रक्रियेची मात्र उमेदवारांना प्रतीक्षा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police recruitment

Police Recruitment : पोलिस भरती अर्ज दाखल; प्रत्यक्ष प्रक्रियेची मात्र उमेदवारांना प्रतीक्षा!

नाशिक : राज्यभर पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र पोलिसदलात १४ हजारांपेक्षा अधिक पदे भरली जात असून, नाशिक ग्रामीणमध्ये १६४ पोलिस शिपाई व १५ चालकांची पदे भरण्यात येणार आहेत. अर्जानंतर आता उमेदवारांना प्रत्यक्ष प्रक्रियेची प्रतीक्षा आहे. (Police recruitment application filed candidates waiting for actual process nashik news)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Labour Federation News : भुजबळ, कोतवालांची सरशी; कोकाटे, दराडेंना धक्का!

पोलिस भरतीसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अर्ज छाननी करण्याचे कामकाज सुरू आहे. तर उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी तयार राहण्याच्या सूचना ग्रामीण अधीक्षक कार्यालयाने दिल्या आहेत. २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरू होणार असून, लवकरच वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

परंतु, नाशिक ग्रामीण भरतीमधील २९० पदे गायब झाल्याचा घोळ भरतीप्रक्रिया सुरू झाल्यावर उघड झाला होता. मात्र, महासंचालक कार्यालयाने अंतिम रिक्त पदांची यादी जाहीर केल्यानुसार १६४ शिपाई व १५ चालकांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार २०१९ नंतर आता पोलिस भरती होत असून, तीन वर्षांनंतरच्या भरतीप्रक्रियेत हजारो अर्ज प्राप्त झाले आहेत.

त्यासंदर्भातील आकडेवारी अद्याप ग्रामीण अधीक्षक कार्यालयाने स्पष्ट केली नसली तरी वेळापत्रकातून त्यासंदर्भातील माहिती स्पष्ट होणार आहे. कोरोनामुळे रोजगार घटल्याने बारावी उत्तीर्णसहित उच्चशिक्षितांचे पोलिस भरतीकडे लक्ष आहे. त्यामुळे २ जानेवारीपासून नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे मैदानी चाचणीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Nashik News : छत्रपती संभाजी स्टेडियम NMCचे की खासगी ट्रेनिंग सेंटरचे?