Police Recruitment : पोलिस चालकपदाच्या लेखी परीक्षेला दोघांनी मारली दांडी!

Police Recruitment
Police Recruitmentesakal

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिस दलातील चालक पदासाठीची लेखी परीक्षा रविवारी (ता. २६) घेण्यात आली. या परीक्षेसाठी पात्र असलेल्या १२४ उमेदवारांपैकी दोघांनी दांडी मारली. महाराष्ट्र पोलिस दलातर्फे राज्यभर एकाचवेळी घेण्यात आलेल्या या चालक पदासाठीच्या लेखी परीक्षेच्या निकालाकडे परीक्षार्थींचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, पोलिस शिपाई पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेची प्रतीक्षा मात्र कायम आहे. (Police Recruitment Two people absent written exam for post of police driver nashik news)

महाराष्ट्र पोलिस दलातर्फे जानेवारीत पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरु झाली होती. नाशिक ग्रामीणमधील चालकपदाच्या १५ आणि शिपाई पदाच्या १६४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. पंधरा वाहन चालकांच्या रिक्त जागांसाठी २ हजार ११४ अर्ज प्राप्त झाले होते.

त्यापैकी २ ते ४ जानेवारीदरम्यान लेखी परीक्षेसाठी १ हजार २४० उमेदवारांनी हजेरी लावली. त्यातून १ हजार २२ उमेदवारांनी वाहन चालविण्याचे प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात आली. या दोन्ही चाचण्यांच्या गुणवत्ता यादीनुसार १२४ उमेदवारांची लेखी परीक्षा निवड करण्यात आली.

या उमेदवारांची रविवारी (ता. २६) सकाळी साडेसहाला पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळील भुजबळ नॉलेज सिटीच्या महाविद्यालयात लेखी परीक्षा घेण्यात आली. शंभर गुणांच्या परीक्षेत अंकगणित, सामान्य घडामोडी, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि मोटार वाहन चालविण्यासह वाहतुकीसंदर्भातचे नियम यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Police Recruitment
Market Committee Election : बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू

या परीक्षेला दोन उमेदवारांची गैरहजेरी लावली असून, १२२ उमेदवार लेखी परीक्षेला हजेरी लावली. परीक्षेवेळी गैरप्रकार रोखण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त व सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात आली होती.

परीक्षार्थींना आवाहन

चालक पदासाठी रविवारी (ता.२६) घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची उत्तरपत्रिका नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या उत्तरपत्रिकेबाबत हरकत असल्यास सोमवारी (ता.२७) दुपारी बारापर्यंत नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामीण पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Police Recruitment
NMC Flower Festival : स्पर्धात्मक प्रदर्शनाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com