
Nashik Crime : स्वातंत्र्यदिनी मंगरूळ (ता. चांदवड) टोल नाक्यावर ध्वजारोहणप्रसंगी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या प्रकरणी चांदवड पोलिसांनी अटक केलेल्या संशयित कर्मचाऱ्यास चांदवड न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
संशयित शहादाब कुरेशी याने या घोषणा दिल्या होत्या. (Police remand youth who shouted Pakistan Zindabad Decision not to take his case Nashik Crime)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पोलिसांनी त्यास अटक करून त्याच्या विरोधात कलम १५३ व १५३- अ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पाकिस्तान झिंदाबादची घोषणा देऊन संशयिताने देशविरोधी कृत्य केल्याने त्याचे वकीलपत्र कोणीही न घेण्याचा निर्णय चांदवड वकील संघाने घेतला आहे.
तशा आशयाचे पत्र चांदवड वकील संघातर्फे न्यायाधीशांकडे देण्यात आल्याची माहिती चांदवड वकील संघाचे अध्यक्ष ॲड. ठाकरे यांनी दिली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.