Belgaum Crime : दारू पिऊन मित्रानेच मित्राचे शीर केले धडावेगळे; मृतदेह पाहताच अकबरच्या कुटुंबीयांचा आक्रोश

दारू पिऊन महांतेशने अकबरचा केला खून
Crime News
Crime Newsesakal
Updated on
Summary

दोघांवरही म्हशी चोरीचे गुन्हे आहेत. त्याच व्यवहारातून हा खून झाला असून, याचा अधिक तपास करण्यात येत आहे.

रायबाग : आर्थिक व्यवहारातून मित्राचा शीर धडावेगळे करून खून केल्याची घटना गुरुवारी (ता. १७) रात्री रायबाग तालुक्यातील (Raibag) हारूगेरीजवळील बस्तवाड येथे घडली. अकबर शब्बीर जमादार (वय २१, रा. हारूगेरी, ता. रायबाग) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Crime News
नीलिमाच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाला अटक, महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता!

पोलिसांनी संशयित मारेकरी मित्र महांतेश शिवलिंग पुजारी (वय २३, रा. बडब्याकुड, ता. रायबाग) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी, अकबर आणि महांतेश हे दोघेही मित्र होते. ते दोघेही म्हशींची चोरी करून त्याची विक्री करत होते. याबाबत त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहेत.

या व्यवहारातून त्यांच्यात वाद झाला असावा. दोघेही गुरुवारी बस्तवाड येथील माळरानात गेले होते. तेथे दारू पिऊन त्यातून महांतेशने अकबरचा खून केला. अकबरच्या आईने पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली.

Crime News
Uday Samant Latest News : गुवाहाटीला जावून आल्यानंतर फक्त माझं खातं बदललं, मी बदललो नाही; असं का म्हणाले उद्योगमंत्री?

घटनास्थळी अथणीचे पोलिस उपअधीक्षक श्रीपाद जल्दे, उपनिरीक्षक गिरिमल उप्पार, गुन्हे विभागाचे उपनिरीक्षक आर. आर. कोगनळ्ळी, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक चांदबी गंगावती, एच. एच. चौगला, आर. पी. कटेकार, एच. आर. आंबी, पी. एम. सप्तसागरे, ए. ए. शांडगी यांनी भेट देऊन पंचनामा केला.

महांतेशला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अकबरचा मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवून त्यानंतर नातेवाईकांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी अकबरच्या कुटुंबाचा आक्रोश सुरू होता.

Crime News
Belgaum Crime : उप्पीटामध्ये विष घालून पतीच्या खुनाचा प्रयत्न; शेतजमीन हडपण्यासाठी पत्नीचं धक्कादायक कृत्य

याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक संजीव पाटील म्हणाले, दोघांवरही म्हशी चोरीचे गुन्हे आहेत. त्याच व्यवहारातून हा खून झाला असून, याचा अधिक तपास करण्यात येत आहे. मोबाईलसह इतर वस्तू जप्त केल्या असून, अधिक तपासासाठी त्या बेळगाव व बंगळूरला पाठविण्यात येणार आहेत. मारेकऱ्याने शीर धडावेगळे करून ते गावात घेऊन आल्याची खात्रीशीर माहिती नाही. त्याबाबतही माहिती घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com