नाशिक- चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळण्याची फारशी शाश्वती नसते; परंतु पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करीत गुन्ह्यांची उकल करीत संशयितांकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. तोच हस्तगत केलेला मुद्देमाल परिमंडळ दोनच्या हद्दीतील सहा पोलिस ठाण्यांच्या ३३ फिर्यादींना सुमारे पाच कोटींचा मुद्देमाल परत करण्यात आला. मुद्देमाल परत मिळाल्याचा आनंद फिर्यादींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.