Navratri Festival
sakal
नाशिक: नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. यात्रा व मंदिरांसह गरबा व दांडियांच्या ठिकाणी साध्या वेशातील निर्भया, दामिनी महिला कर्मचाऱ्यांच्या पथकाची नजर असणार आहे. दरम्यान, साउंड सिस्टीमला ध्वनिमर्यादेचे पालन बंधनकारक असून, उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.