Crime
sakal
नाशिक: शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या आठवड्यात परिमंडळ एकमधून सराईत गुंडांविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आल्यानंतर, सोमवारी (ता. २९) परिमंडळ दोनच्या उपायुक्तांनी सहा सराईत गुंडांना दोन वर्षांसाठी शहर-जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तसेच, गंभीर गुन्हे असलेल्यांविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाईचे संकेत दिले आहेत.