विनाकारण फिरणाऱ्यांवर लासलगावला दंडात्मक कारवाई

लासलगाव शहरात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता, तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
lasalgaoan
lasalgaoanSakal
Updated on

लासलगाव (जि. नाशिक) : लासलगाव शहरात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता, तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. जानेवारीपासून ते आजपर्यंत लासलगाव पोलिस ठाण्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४०० नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात दोन लाख एक हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पुढे सुरूच राहणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली. (Police take action on those who roamed in Lasalgaon without any reason)

लासलगाव शहरासह निफाड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आली असून, आगामी काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याकरिता लासलगाव पोलिस, ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून योग्य खबरदारी घेतली जात आहे. अनेक नागरिक जीवनावश्यक वस्तू, तसेच मेडिकल व इतर कारणांमुळे रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत. अशा फिरणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाने कठोर दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात केली. नाशिक जिल्ह्यात १२ ते २३ मेपर्यंत लॉकडाउन (Lockdown) लावण्यात आला आहे. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी पोलिस करीत आहेत.

(Police take action on those who roamed in Lasalgaon without any reason)

lasalgaoan
तौक्ते चक्रीवादळाचा द्राक्षवेलींना फटका; कोवळ्या फांद्या तुटल्या, शेतकरी चिंतेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

aaple sarkar seva kendra
Judiciary Transition: Judge Uday Hingmire Transferred from Satana to Bhandara District
Ambad village drinking water shortage
Minor student blackmail case in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com