City Police
sakal
नाशिक: शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात अंबड, सातपूर, गंगापूर, मुंबई नाका, आडगाव या पोलिस ठाण्यांसह चुंचाळे पोलिस चौकीच्या प्रभारींमध्ये फेरबदल करण्यात आले. वाहतूक शाखेच्या प्रभारींमध्येही खांदेपालट करण्यात आली आहे.