नाशिक- उन्हाळ्याचा चटका जाणवू लागल्याने शहरात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी वितरणातील त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणात विस्कळितपणा येऊन अपुरा पाणीपुरवठा शहरातील विविध विभागांत होत आहे..परिणामी नागरिकांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन महापालिका मुख्यालयात शिवसेना (उबाठा), भाजप व मनसेकडून महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन देऊन प्रशासनाला इशारा दिला. पंचवटीतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या दिला..ठाकरे सेना आक्रमकतीन दिवसांपासून शहरात पाणीबाणी निर्माण झाल्याने नागरिकांना त्रास झाला. लोकप्रतिनिधींवर नागरिकांनी रोष व्यक्त केला. भविष्यात असे प्रकार घडू नये अन्यथा मोठे आंदोलन उभे करू. असे आयुक्त मनिषा खत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तांत्रिक कामे तातडीने पूर्ण करून युद्धपातळीवर पाणीपुरवठा सुरळीत करावा, गोदावरीत मिसळणारे सांडपाणी बंद करून साधू-महंतांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे. .औद्योगिक वसाहतीत सांडपाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी, औद्योगिक वसाहतीतील पथदीप सुरळीत करावे, घरपट्टी दरवाढ मागे घ्यावी. गोदा किनारी भाविकांसाठी निवारा शेड उभारावे, रिक्त पदे तातडीने भरावी, महापालिकेच्या आरक्षित जागेवर भाजी मार्केट करावे आदी मागण्या करण्यात आल्या. शिवसेना उपनेते सुनील बागूल, सुधाकर बडगुजर, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे, सचिन मराठे, प्रशांत दिवे आदी उपस्थित होते..मनसेतर्फे साखळी उपोषणाचा इशारामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. अनियमित पाणीपुरवठ्याबरोबरच कमी दाबाने व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे गृहिणी त्रस्त आहे. त्याचबरोबर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली आहे. दोन दिवसात पाणीप्रश्न न सोडविल्यास साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला. होणाऱ्या परिणामास महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले. प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार ईचम, सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे आदी उपस्थित होते..गोविंदनगरला अपुरा पुरवठापश्चिमेच्या आमदार सीमा हिरे यांनी गोविंदनगर भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली. अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच अंबड औद्योगिक वसाहतीमधील शेड संदर्भातील प्रश्न सोडविण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, प्रभाग २४ मध्ये टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने पाणीपट्टीत पन्नास टक्के सवलत द्या, अशी मागणी शिवसेना (उबाठा) व सत्कार्य फाउंडेशनने नागरिकांच्या वतीने केली आहे. .सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने शुक्रवारी शिष्टमंडळाने आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेतली. या सर्व समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली..सुरक्षा रक्षकांमध्ये झटापटप्रभाग क्रमांक तीनमध्ये अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे माजी नगरसेविका प्रियांका माने यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढण्यात आला. याप्रकरणी आयुक्त मनिषा खत्री यांना निवेदन देण्यात आले. प्रभाग तीनमधील सरस्वतीनगर, बळीरामनगर, बळीराजनगर, आशापुरा सोसायटी, झोपे गार्डन, हरीओम कपालेश्वर कॉलनी, ओंकारेश्वर कॉलनी, मानेनगर, गजानन कॉलनी, दत्तात्रेय चौक, चक्रधरनगर, वृंदावन कॉलनी, लक्ष्मीनगर, औदुंबर नगर, गोपाळनगर आदी भागात मागील दोन महिन्यांपासून पिण्यासाठीदेखील पाणी उपलब्ध होत नाही. .तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. प्रभागात खासगी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. आंदोलनकर्त्या महिलांना प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला. मुख्यालयात प्रवेश न दिल्याने सुरक्षारक्षक व आंदोलकांमध्ये झटापट झाली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.