नाशिक- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाल्यावर आता प्रभागांमध्ये प्राबल्य असलेल्या इच्छुकांच्या हालचाली व त्यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली येत्या काही दिवसांत गतिमान होणार आहेत. असे असले तरी महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढविण्याचे स्पष्टीकरण देण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या आशा बळावल्या आहेत. दुसरीकडे पक्षाच्या उमेदवारांची पळवापळवी होण्याच्या शक्यतेने राजकीय पक्ष सजग होताना दिसत आहेत.