esakal | मंदिरांचे दार उघडताच दर्शनासाठी राजकीय पक्षांचे पर्यटन; नेते, कार्यकर्त्यांनी केले पूजाविधी
sakal

बोलून बातमी शोधा

political party

मंदिरांचे दार उघडताच दर्शनासाठी राजकीय पक्षांचे पर्यटन

sakal_logo
By
प्रमोद सावंत


मालेगाव (जि. नाशिक) : कोरोना (Corona) संसर्गानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार भक्ती मंदिरांचे द्वार उघडताच निर्णयाचे स्वागत व दर्शनासाठी राजकीय पक्षांचे पर्यटन झाले. विविध राजकीय पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांनी मंदिर उघडण्याच्या निर्णयाचा उत्सव साजरा केला.

भाजपचा कुलस्वामिनीसमोर जागर...

कोरोना संसर्गात राज्य शासनाने देवी-देवतांना कडी कुलुपात बंद करून ठेवले होते. भाजपने आंदोलने केल्यानंतर शासनाने मंदिरे उघडली. यामुळे राज्यातील जनतेसह भाविकांना दिलासा मिळाला, असे मत भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांनी व्यक्त केले. श्री. निकम व सहकाऱ्यांनी कलेक्टरपट्टा येथील श्री कुलस्वामिनी साडेतीन शक्तिपीठ मंदिरात जागर करीत आनंदोत्सव साजरा करुन महाआरती केली. मंदिरात नवरात्रोत्सव साजरा होणार असून, भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापक सुधीर जाधव यांनी केले. भाजपने घटस्थापनेला सर्वत्र आनंदोत्सव साजरा करत देवदर्शन केले. मंदिरावर अवलंबून असलेल्या किरकोळ व्यावसायिकांनाही हायसे वाटले.

हेही वाचा: 'कोरोना संकट दूर होऊ दे' - छगन भुजबळांची सप्तश्रृंगीचरणी प्रार्थना

या वेळी पोपट लोंढे, हरिप्रसाद गुप्ता, सुधीर जाधव, योगेश पाथरे, बाळासाहेब सावकार, राजू गायकवाड, हेमंत पूरकर, बापू वाघ, प्रकाश मुळे, रविष मारू, कमलेश सोनवणे, कुणाल सूर्यवंशी, स्वप्नील भदाणे, महेश जाधव आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्याचे ग्रामदैवत श्री मल्हारी मार्तंड खंडोबाराय महाराज यांच्या मंदिरात पूजा आणि तळी भरण्याचा कार्यक्रम केला. ज्येष्ठ नेते राजेंद्र भोसले यांनी सपत्नीक तळी भरली. शासनाच्या कोरोनानंतर राज्यातील सर्व मंदिरे नव्याने सुरू करण्याच्या आदेशाचे स्वागत केले.
या वेळी राजेंद्र भोसले म्हणाले, की पूर्वीच्या काळी बळीराजाच्या मस्तकावर पाय ठेवून पाताळात बळीराजाला जमिनीखाली गाडण्यात आले. केंद्र आता गाडीच्या चाकाखाली शेतकऱ्यांना तुडवित आहे. ७० रुपये किलोचे तेल २००, गॅस एक हजार तर पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केली आहे. एकंदरीतच सुलतानाची सूनवाई नसल्याने परमेश्‍वराच्या दरबारात महागाई कमी करण्यासाठी व सत्ताधाऱ्यांना सुबुध्दी देओ अशी प्रार्थना करण्यासाठी आम्ही मंदिरात आलो. राज्य शासन व पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानतो. पक्ष कार्यकर्त्यांनी मोसम व गिरणा नदीच्या काठावरील नालंदा बुद्ध विहारालाही भेट दिली. बुद्धांच्या अहिंसा आणि शांततेच्या शिकवणीची आज नितांत गरज असल्याच्या भावना व्यक्त झाल्या.

हेही वाचा: मंत्रघोष आणि जयघोषात खुले झाले आदिमाया सप्तशृंगीचे मंदीर

या वेळी तालुकाध्यक्ष संदीप पवार, विनोद चव्हाण, नरेंद्र सोनवणे, दिनेश ठाकरे, अनंत भोसले, किशोर इंगळे, चिंतामण पगारे, प्रकाश वाघ, हेमलता मानकर, ॲड. सुचेता सोनवणे, बिपीन बच्छाव, पांडुरंग भदाणे, निलेश पाटील, अनिल पाटील, दिनेश पाटील, कल्पेश गायकवाड, शंकर नागपुरे, शिवा पाटील, अशोक चित्ता, अशोक ह्याळीज, मुकेश शर्मा, शाम शिंपी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

loading image
go to top