Mahajan vs Bhuse
sakal
नाशिक: राज्यातील महायुतीत एकत्र काम करणारे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यातील स्पर्धा आता नगरपालिका निवडणुकांनिमित्ताने नव्या रूपात उफाळून आली आहे. भुसे यांची राजकीय कोंडी करण्याच्या उद्देशाने मंत्री महाजन यांनी मालेगावचे अद्वय हिरे यांचा भाजपमध्ये प्रवेश करवून घेतला. यानंतर जिल्ह्यातील विविध नगरपालिकांमधील राजकीय समीकरणांमुळे ही जुनी स्पर्धा नव्या रणांगणात उतरल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.