Crime
sakal
पंचवटी परिसरातील निर्जनस्थळी एका गरोदर महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. प्रत्यक्ष साक्षीदार कोणीही नसताना खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान म्हसरूळ पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक निरीक्षक शिवाजी अहिरे यांच्यासमोर असताना, त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि पारंपरिक तपासाच्या अनुभवावर अवघ्या काही तासांत आरोपीची माहिती मिळविली. त्यानंतर परराज्यांत पसार झालेल्या आरोपीला अटकही केली.