
Success Story : केरसाणेतील पुनम अहिरेनी उपजिल्हाधिकारी पदाला घातली गवसणी!
नरकोळ (जि. नाशिक) : केरसाणे ता.बागलाण येथील पुनम भिला अहिरे हिने अभ्यासात जिद्द आणि चिकाटी ठेवल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२१च्या परीक्षेत राज्यात ओ.बी.सी गटातून मुलींमध्ये तिसरी आली. (Poonam Ahire stood third among girls from OBC category got post of Deputy Collector in Rajyaseva 2021 examination conducted by mpsc nashik news)
तिने या परीक्षेत घवघवीत यश मिळवित उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. या यशाबद्दल गावांसह परीसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, गेल्या वर्षी पुनमने याच परीक्षेत अधिकारी, २ पद यशस्वी होऊन मंञालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
पुनम सध्या आयुष्याची डायरी या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा धारकांना मार्गदर्शन करीत आहे. पुनम लहानपणापासून हुशार व बुध्दीमान होती अभ्यासात सातत्य ठेवले या बळावर तिने यश संपादन केले. पुनम सध्या नागपूर येथे प्रशिक्षण घेत आहे, पुनमचे वडील बलायदुरी ता.इगतपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक तर आई शिक्षिका आहेत.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
केरसाणे गावाचे नाव पुनमने उंचावले
बागलाण तालुक्यातील केरसाणे हे पश्र्चिम पट्यातील २००० ते २३०० लोकवस्तीचे गाव भुईमूग शेंगा उत्पादनात अग्रेसर म्हणून सटाणा मार्कट यार्ट मध्ये नावाजलेल्या गावातील पुनमने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात गावाचे नाव उंचवल्याबद्दल गावाने पुनमवर कौतुकाचा वर्षाव केला.
"पुनमने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घेतल्याचा आनंद झाला,आमचे कुटुंब गरीबीतून गेल्यानेआम्हाला पुनमच्या रुपाने कष्टाला फळ मिळाले पुनमने गरीबाची सेवा करावी हीच अपेक्षा" -नानाजी संपत अहिरे, केरसाणे ता.बागलाण पुनमचे आजोबा
"आभ्यासात सातत्य ठेवल्यास यश हमखास मिळते मंञालयात कक्ष अधिकारी पद मिळाले त्यानंतर आता उपजिल्हाधिकारी पद मिळाले आता यापुढे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले आहे आई-वडील यांनी सहकार्य केले त्यामुळे या पदापर्यंत पोचली"- पुनम भिला अहिरे, मंञालय कक्ष अधिकारी