Nashik News : विमानसेवेसाठी सकारात्मक हालचाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik: Officials of various organizations including AIMA attended the meeting held to start national and international air services from here

Nashik News : विमानसेवेसाठी सकारात्मक हालचाली

सातपूर : नाशिकसाठी विनाखंड राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू व्हावी यासाठी आयमातर्फे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना नाशिकमधून मोठ्या प्रमाणात प्रवासी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकारही घेतला आहे.

त्याचा जोरदार प्रचार आणि प्रसारही सुरू झाला आहे. विमानसेवा कंपन्यानीही त्याबाबत स्वारस्य दाखवून आयमा आणि नाशकातील विविध संघटनांशी संपर्क साधत आहेत, ही स्वागतार्ह बाब असल्याचे आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ यांनी सांगितले. (Positive move for aviation National and International Air Service from Nashik Initiative by AIMA support of various organizations Nashik News )

नाशिकहून उद्योजक, व्यापारी, आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे अधिक व्यापक जाळे विणण्याच्या हालचालींचा एक भाग म्हणून इंडिगो एअरलाईन्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाशिकमधील औद्योगिकसह संबंधित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयामा रिक्रिएशन सेंटर येथे बैठक झाली.

त्यात नाशकात उपलब्ध असलेल्या मुलभूत तसेच विविध सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी श्री. पांचाळ बोलत होते. व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, आयमाचे सरचिटणीस ललित बूब, हवाई वाहतूक समितीचे अध्यक्ष मनीष रावल, इंडिगो एअरलाईन्सचे अधिकारी गौरव जाजू व शशांक लट्टू होते.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

इंडिगोतर्फे नाशिकहून अहमदाबाद, गोवा, नागपूर, मुंबई, पुणे, चेन्नई, बंगलोर, राज्यस्थान व अन्य महत्वाच्या शहरांसाठी हवाई वाहतूक सेवा सुरु होण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. नाशिकमध्ये मोठे पोटेंशिअल आहे, विमानसेवेचा जास्तीत जास्त नाशिककरांनी लाभ घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही पांचाळ यांनी केले.

मोठ्याप्रमाणात आयटी कंपन्या नाशकात येण्यास उत्सुक असून त्यांच्यासाठी विमानसेवेचे व्यापक जाळे एकप्रकारे रेड कार्पेटच ठरणार आहे.त्यामुळेच नाशकातील संबंधित विविध संघटनांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि नाशिकचे नांव विमानसेवेसाठी जागतिक नकाशावर ठळकपणे झळकविण्यासाठी सर्वानी हातातहात घालून काम करूया.

असे आवाहन ललित बूब यांनी केले असता सर्वानी हात उंचावून त्याला जोरदार समर्थन दिले.विमान कंपन्यांच्या बुलेटिनमध्ये जाहिरात देण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

इंडिगो एअरलाईन्सचे अधिकारी गौरव जाजू व शशांक लट्टू यांनी सर्व औद्योगिक प्रतिनिधींची मते जाणून घेतली व इंडिगोतर्फे नाशिककरांना लवकरच पूर्ण क्षमतेने सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

बैठकीत निमा, नाईस, निवेक, लघु उद्योग भरती, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, महाराष्ट्र चेंबर, क्रेडाई, ट्रान्सपोर्ट अससोसिएशन, सीआयआयए, नाशिक फर्स्ट, नीट, सी.ए.असोसिएशन, नाशिक इंजिनिअरींग क्लस्टर, ट्रॅव्हल्स अससोसिएशन, तान असोसिएशन, ज्वेलर्स असोसिएशन, मी नाशिककर, आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशन, इंडिअन मेडिकल अससोसिएशन, हॉटेल असोसिएशन आदी विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच मांगीलाल मीना, नितीनकुमार सिंग, सुनील वाघ, योगेश बहलकर, विजय अनिकिवी, देवेंद्र राणे, भूषण मट्टाणी, मुकेश कोठावदे, सोहेल शहा, कुणाल पाटील, गौरव ठक्कर, संजय सोनावणे, संजय महाजन, ऋषिकेश वादळकर, विशाल जोशी, अमित आलई, संतोष कुटे, पुनित राय, लीलाधर जावळे, संदीप जाधव, राजेंद्र अहिरे, किशोर अहिरे, मनीष कोठारी आदी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनीष रावल यांनी सूत्रसंचलन केले. सरचिटणीस ललित बूब यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikair service