Degree Admission : बारावीनंतरच्‍या पदविकेच्‍या प्रवेशाची प्रक्रिया लांबली | Latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

admission process delay

Degree Admission : बारावीनंतरच्‍या पदविकेच्‍या प्रवेशाची प्रक्रिया लांबली

नाशिक : बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ दिलेली आहे. या वाढीव मुदतीनुसार विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता.२६) पर्यंत नोंदणी करता येईल. दरम्‍यान वारंवार मुदतवाढ दिल्‍याने औषधनिर्माणशास्‍त्र, हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरींग टेक्‍नॉलॉजी यासह कोटींग ॲण्ड सर्फेस टेक्‍नॉलॉजी या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया लांबली आहे. (Post 12th degree admission process has been delayed nashik Latest marathi news)

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : शहराच्या विविध भागात गणेशमूर्तींचे स्टॉल सजले

विविध तंत्रशिक्षण व व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरु आहे. काही अभ्यासक्रमांना सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार असून, परीक्षा प्रक्रिया सध्या सुरु आहे. पदविका अभ्यासक्रमांना थेट कॅप राउंडच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जात असून, दहावी व बारावीनंतर पदविका शिक्षणाचे पर्याय उपलब्‍ध आहेत.

यापैकी बारावीनंतर औषधनिर्माणशास्‍त्र, हॉटेल मॅनजेमेंट ॲण्ड केटरींग टेक्‍नॉलॉजी आणि कोटींग ॲण्ड सर्फेस टेक्‍नॉलॉजी या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सध्या सुरु आहे. डीटीईने जारी केलेल्‍या वेळापत्रकानुसार नोंदणीसाठी शुक्रवार (ता.२६) पर्यंत मुदत असेल.

याच कालावधीत विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ई-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. दरम्‍यान नोंदणीला मुदतवाढ दिल्‍याने कॅप राउंडमार्फत प्रत्‍यक्ष प्रवेश निश्‍चितीच्‍या प्रक्रियेला सप्‍टेंबर उजाडणार आहे. याचा परिणाम अध्ययनावर होण्याची भिती व्‍यक्‍त होते आहे.

असे आहे पुढील वेळापत्रक

नोंदणीची मुदत संपल्‍यानंतर २८ ऑगस्‍टला प्रारुप गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे. या यादीसंदर्भात तक्रार किंवा हरकत नोंदविण्यासाठी २९ ते ३१ ऑगस्‍टदर

हेही वाचा: Swine Flu Update : शहरात रुग्णांनी गाठली शंभरी

Web Title: Post 12th Degree Admission Process Has Been Delayed Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikdegree admission