शहरातील टपाल पेट्यांना लागली घरघर; विभागाचे होतेय दुर्लक्ष

A post box at Qazipura in a broken condition.
A post box at Qazipura in a broken condition.esakal
Updated on

जुने नाशिक : टपाल विभागाकडून नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या विविध भागात टपाल पेट्या लावण्यात आल्या आहे. त्यातील अनेक टपाल पेट्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांची सोय होण्यापेक्षा गैरसोय होत आहे. (Post boxes in city in critical condition Neglect of postal department Nashik Latest Marathi News)

A post box at Qazipura in a broken condition.
Sakal Exclusive : गुणवत्ता- नियंत्रण विभागाला टाळे ठोकण्याची वेळ

ऑनलाइन संभाषणाच्या दुनियेत आजही टपाल विभागाने आपली विश्वासार्हता जपून ठेवली आहे. इंटरनेट, व्हॉट्स ॲप, फेसबुक या विविध सोशल मीडियातून आणि मोबाईल माध्यमातून नागरिक एकमेकांशी संभाषण करत खुशाली जाणून घेतात. बहुतांशी नागरिक असे आहे, की आजही टपाल विभागावर विश्वास ठेवत पत्राद्वारे नातेवाइकांची माहिती जाणून घेत असतात.

असे नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिक, ते राहत असलेल्या भागात किंवा परिसरात असलेल्या टपाल पेटीमध्ये पत्र पोस्ट करतात. त्यानंतर टपाल कर्मचारी येऊन पेटीतील संपूर्ण टपाल कार्यालयात घेऊन जातात. त्यानंतर टपाल विभागाच्या विविध माध्यमातून ते टपाल पत्र संबंधित ठिकाणी पोचवले जातात. परंतु टपाल विभागाच्या देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे विविध भागातील टपाल पेट्या फुटून दयनीय अवस्था झाली आहे.

त्यात टपाल टाकणे गैरसोयीचे ठरत आहे. परिसरातील चोर, भामटे त्यातून पत्र काढून फेकणे, कचरा टाकणे असे प्रकार करत असतात. त्यामुळे पेट्यांमधील पत्र गहाळ होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुटलेल्या भागातून पाणी फेट्यांमध्ये शिरून त्यातील पत्र ओले होऊन खराब होऊ शकतात. यामुळे नागरिक अशा टपाल पेट्यामध्ये पत्र टाकण्यापेक्षा सरळ टपाल कार्यालयाचा रस्ता धरत असतात.

त्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय होत असते. शिवाय त्यातूनच पत्र पाठवण्याकडे नागरिक पाठ फिरवत आहे. त्याचा परिणाम कुठेतरी टपाल कार्यावरदेखील होत आहे. अशा गोष्टी टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांमार्फत वेळोवेळी टपाल पेट्यांचे दुरुस्ती करून घ्यावी. दुरुस्तीच्या पलीकडे असलेल्या पेट्या बदलून नवीन पेट्या लावण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

तुटलेल्या अवस्थेत असलेल्या पेटीमध्ये टपाल टाकण्यासाठी नागरिक काणाडोळा करत असल्याने अनेक पेट्या सध्या बंद अवस्थेत आहे. त्यातीलच एक पेटी काझीपुरा पोलिस चौकी जुने नाशिक येथे आहे. पेटीची दुरवस्था झाल्याने नागरिक त्यात टपाल टाकत नाही. कालांतराने ती पेटी सध्या बंद अवस्थेत आहे.

A post box at Qazipura in a broken condition.
ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या मालेगावच्या तरुणास मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhagan Bhujbal on Nashik road potholes
Nashik Pothole Issue
Nashik Weather Alert Saptashrungi Gad Nanduri Ghat Closed for Traffic Due to Heavy Rain and Strong Winds
The former Zilla Parishad school student has become an inspiration for rural and tribal students across Maharashtra.
Marathi News Esakal
www.esakal.com