Sakal Exclusive : गुणवत्ता- नियंत्रण विभागाला टाळे ठोकण्याची वेळ

road construction
road constructionesakal

नाशिक : नव्याने तयार होणाऱ्या रस्त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच अर्थ महापालिकेच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागावर आता कोणाचाच भरवसा राहिलेला नाही. त्यामुळे हा विभाग बंद करण्याची वेळ आली आहे. मागील पंचवार्षिकमध्ये शहरातील रस्त्यांवर साडेसहाशे कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली.

परंतु, रस्त्यांची गुणवत्ता यंदाच्या पावसाळ्यात उघड पडली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे तर पडलेच नव्याने केलेल्या रस्त्यावरचा पहिला थरच वाहून केल्याने फक्त डांबराचा फराटा मारल्याचे स्पष्ट झाले. (Sakal Exclusive news Time to shut down quality control department of newly constructed roads Nashik News)

इतर शहरांमध्ये कधीकाळी नाशिकच्या रस्त्यांचे आदर्शवत उदाहरणे दिली जात होती. आता सी-सॉ खेळायचे असेल तर नाशिकच्या रस्त्यांवरून वाहने चालवा असे उपरोधिकपणे म्हटले जाते. पैशांच्या उधळपट्टीला गुणवत्ता व नियंत्रण विभाग कारणीभूत आहे.

या विभागाने प्रामाणिकपणे काम केले असते तर रस्त्यांची दयनीय अवस्था झाली नसती. ही बाब हेरून महापालिका प्रशासनाने यापुढे नव्याने तयार होणाऱ्या रस्त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाची ही भूमिका स्वागतार्ह आहे. मात्र, या भूमिकेने नाशिककरांसमोर अनेक प्रश्न निर्माण केले आहे.

गुणवत्ता विभागाचे काम काय?

महापालिकेत स्वतंत्र गुणवत्ता व नियंत्रण विभाग आहे. रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी या विभागाची आहे. या विभागासाठी स्वतंत्र उपअभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रस्त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी त्रयस्थ संस्था नियुक्त करायची असेल तर महापालिकेच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागावरच विश्वास नाही, असा एक अर्थ होतो. या विभागाला कामच राहणार नसल्याने टाळे ठोकून तेथील अधिकारी व कर्मचारी वर्ग करावे, अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे.

फसव्या प्रयोगाचा क्रम

- २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडला. त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात रस्ते झाले. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी रस्त्यांसह इतर कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी क.का. अभियांत्रिकी महाविद्यालय व पवई आयआयटी संस्थेची नियुक्ती केली.

- २०१७ मध्ये अभिषेक कृष्णा यांच्याही कार्यकाळात त्रयस्थ संस्थेची घोषणा झाली. परंतु त्यांच्या बदलीनंतर तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रस्त्यांची कामे थांबविली.

- २०१८ मध्ये राधाकृष्ण गमे यांनी रस्ते कामांवर स्वतः लक्ष ठेवताना त्रयस्थ संस्थेकडून तपासणी केली.

- गमे यांच्यानंतर मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे झाली. त्याच कामांची गुणवत्ता आता खड्डे व खरबुड्या रस्त्यांवरून चालताना दिसत आहे.

- याचाच अर्थ २०१५ वगळता त्रयस्थ संस्था नियुक्त करण्याचा प्रयोग यापूर्वीदेखील झाला आहे त्यातून हाती काही पडत नाही वेळ मात्र निघून जाते असा नाशिककरांचा अनुभव आहे.

road construction
Crime Update : बंद घरातून सोन्याचा राणीहार लंपास

अधिकाऱ्यांची तारांबळ

- डॉ. गेडाम यांच्या त्रयस्थ संस्था नियुक्तीच्या प्रयोगाने अधिकाऱ्यांची झोप उडवली होती. कामे गुणवत्तापूर्ण न झाल्यास याद राखा, असा दम ठेकेदारांच्या बैठकीत तत्कालीन शहर अभियंता सुनील खुने यांनी दिला होता. परिणामी संस्था तयार झालेले रिंग रोड अद्यापही सुस्थितीत आहे.

- डॉ. गेडाम यांनी त्रयस्थ संस्था नियुक्तीचा निर्णय घेतल्यानंतर काही घटना घडल्या. त्या अशा साधूग्राम उभारणीचे काम करणारा एक अभियंता मातीच्या ढिगाऱ्‍यावरून कोसळला नंतर महिनाभर उपचारासाठी घरीच बसला. एका अभियंत्याच्या डोळ्यासमोर अचानक अंधाऱ्या आल्याने तोदेखील घरी बसला. त्रयस्थ संस्थेचा निर्णय अनेकांच्या जिव्हारी लागला खरा, मात्र कामांची गुणवत्ता मात्र सुधारली.

road construction
Nashik Crime : डॉक्टरला पावणेसहा लाखाला गंडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com