नाशिक- नाशिक रोड येथील टपाल विभागाच्या एटीएममधून बनावट एटीएमद्वारे १४ लाख रुपये काढण्यात आले. त्यामुळे नाशिक टपाल कार्यालयात खळबळ उडाली आहे. नाशिक रोड मुख्य टपाल कार्यालय व जनरल पोस्ट ऑफिस येथील कार्यालयाच्या आवारात टपाल विभागाचे डीओपीएन ०६२९ एटीएमचे चोरट्यांनी २० वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड बनविले. त्याद्वारे १२४ बनावट व्यवहार करून दहा लाख वीस हजार रुपये काढून घेतले. तसेच एटीएम क्रमांक डीओपीएन ०६०९