Nashik Post : आनंदाची बातमी! टपाल विभागाकडून आता कॅनडा, अमेरिकेतही पोचणार दिवाळी फराळ!
Nashik Postal Service Enables Diwali Farsan Delivery Abroad : २९ सप्टेंबरपासून ते बुधवार पर्यंत तब्बल १८ देशात ७३ फराळाचे पार्सल पाठविण्यात आले आहे. त्यातून सुमारे साडेपाच लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.
जुने नाशिक: टपाल विभागाकडून १२० देशांमध्ये दिवाळी फराळ पोचविण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु सर्वाधिक भारतीयांचे वास्तव्य असलेल्या कॅनडा आणि अमेरिका देशात मात्र बंदी होती.