Nashik News : अमरावती अपर आयुक्त नियुक्तीला ‘मॅट’ची स्थगिती

Department of Tribal Development
Department of Tribal Developmentesakal

Nashik News : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांची प्रशासकीय कारणास्तव कार्यकाळ संपण्यापूर्वीच बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रतिनियुक्तीने साताऱ्याच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक चंचल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याविरोधात वानखेडे यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली. ‘मॅट’ ने पुढील सुनावणीपर्यंत पाटील यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. (Postponement of MAT for appointment of Amravati Additional Commissioner Nashik News)

आदिवासी विकास विभागाचे चार अपर आयुक्तांपैकी सद्यःस्थितीत ठाणे व नागपूर येथे आयएएस तर नाशिक व अमरावती येथे आदिवासी विकास सेवेतील अधिकारी कार्यरत होते. अमरावतीचे अपर आयुक्त वानखेडेंची कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच बदली करण्यात आली असून, त्यांच्या रिक्त जागी ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्ती करण्यात आल्याने आदिवासी विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटना संतप्त झाल्या आहेत.

अमरावती अपर आयुक्त वानखेडे यांची मुदतपूर्व बदलीसह प्रतिनियुक्तीसंदर्भात शुक्रवारी (ता.२८) ‘मॅट’मध्ये सुनावणी होणार आहे. तोपर्यंत चंचल पाटील यांच्या नियुक्तीला स्थगिती कायम राहणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Department of Tribal Development
Nashik: कृषी, औद्योगिक, पर्यटनाचा 3 महिन्यात अहवाल द्या; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सूचना

आदिवासी विकास मंत्र्यांना शिष्टमंडळ भेटणार

अमरावतीप्रमाणेच अपर आयुक्त (मुख्यालय) तसेच घोडेगाव आणि राजुर प्रकल्प अधिकारी पदावर इतर विभागातून प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक रद्द करण्याच्या मागणी संघटनेकडून केली जात आहे.

या संदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची लवकरच संघटनेचे शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचे समजते. दरम्यान, ‘मॅट’च्या निकालानंतर आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Department of Tribal Development
Uday Samant : ‘क्लस्टर’साठी नाशिकचा प्राधान्याने विचार व्हावा : निमाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना साकडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com