नाशिक : खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास; वाहनधारक, पालक त्रस्त

पावसामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा म्हणण्याची वेळी नागरिकांवर आली आहे.
Patholes
Patholesesakal

नाशिक : लक्ष्मणसृष्टी, पवार मळा, तपोवन परिसरातील या मार्गावरील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे झालेले आहे. पावसामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा म्हणण्याची वेळी नागरिकांवर आली आहे. सदर रस्त्यावर क्लिफोर्ड इंटरनॅशनल व गोल्डन डे स्कूल या दोन शाळा आहेत. यामुळे शाळेत ये- जा करणारे विद्यार्थी व पालकांना जीव मुठीत धरून रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे. (Latest Marathi News)

खड्डे, ड्रेनेजमुळे निर्माण झालेले अडथळे अशा अनेक प्रवास करताना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या रस्त्यावर दोन शाळा असल्यामुळे स्कूल बस, पालकांना वाहनांना चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही विद्यार्थी पायी अथवा सायकलीवर प्रवास करतात. त्यामुळे त्यांना गंभीर शारीरिक दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर रस्ता महापालिकेने त्वरित दुरुस्त करावा व शक्य असल्यास रुंदीकरण करावा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. या भागामध्ये सध्या नागरिक वस्तीचे प्रमाणही वाढले असल्यामुळे या रस्त्यावरून सतत रहदारी सुरू असते. अनेक वाहने खड्ड्यांची पर्वा न करता भरधाव जात असतात.

Patholes
विमानातच IPS ची तब्येत बिघडली, 39 वर हृदयाचे ठोके; राज्यपालांनी वाचवला जीव

वाहनचालकांचे नियंत्रण सुटून खड्ड्यांमुळे मोठा अपघातही होऊ शकतो. शाळेजवळ गतिरोधक टाकण्याची गरज आहे. पावसाळ्यामुळे खड्डे आणखीच वाढत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्डा किती खोल आहे, याचा अंदाजही येत नाही. खड्ड्यात त्या भागातून वाहने जाताना रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्यांवर चिखल व पाणीही उडत आहे. त्यामुळे येथे अनेक वादाचे प्रसंगही घडत आहे. नागरिकांनी मनपाचे सर्व कर भरूनही तसेच शाळांनी मनपाच्या नियमाने सर्व पूर्तता करूनही रस्त्याची अशी दुर्दशा झाली आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी पालक, प्रवासी व वाहनधारक करीत आहेत.

''सदर मार्गावर दोन शाळा असून, या रस्त्यावर चार महिन्यापूर्वी भुयारी गटार योजनेचे काम झाले होते. त्यावर डांबरीकरण होणे गरजेचे होते. तरी प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांचा विचार करून डांबरीकरण करून रस्ता दुरुस्त करावा.'' - के. एस. आझाद, सचिव, क्लिफोर्ड इंटरनॅशनल स्कूल

Patholes
आरे मेट्रो कारशेड प्रकरणी आंदोलकाना पोलिसांकडून नोटीस...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com