विमानातच IPS ची तब्येत बिघडली, 39 वर हृदयाचे ठोके; राज्यपालांनी वाचवला जीव

governor save ips officer life onboard flight
governor save ips officer life onboard flight

अमरावती : दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्याची प्रकृती अचानक बिघडली. त्याच फ्लाईटमध्ये तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन त्याच विमानात प्रवास करत होत्या. डॉक्टर असलेल्या राज्यपाल सौदर्यराजन यांनी कर्तव्य बजावत अधिकाऱ्याचे प्राण वाचवले. (governor save ips officer onboard flight news in marathi)

governor save ips officer life onboard flight
भाजप प्रवक्त्याकडून सोनिया गांधीबद्दल अपशब्द; कॉंग्रेसची नड्डांकडे तक्रार

कृपानंद त्रिपाठी उजेला, असं आयपीएस अधिकाऱ्यांचे नाव असून ते 1994 च्या बॅचचे अधिकारी आहेत. उजेला डेंग्यू तापाने ग्रस्त होते. त्यांच्यावर आता हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.राज्यपाल मॅडम यांनी माझे प्राण वाचवले. त्यांनी मला आईप्रमाणे मदत केली. अन्यथा मी रुग्णालयात पोहोचलोच नसतो," असे उजेला यांनी शनिवारी हैदराबादहून फोनवरून पीटीआयला सांगितले. आंध्र प्रदेश केडरचे अधिकारी असलेले उजेला सध्या अतिरिक्त DGP (रोड सेफ्टी) म्हणून तैनात आहेत.

शुक्रवारी मध्यरात्रीच्या तेलंगणाची राजधानी हैद्राबादकडे निघालेल्या विमानाने उड्डाण केल्यानंतर उजैला यांनी तब्येतीची तक्रार केली होती. त्यानंतर राज्यपाल सौंदर्यराजन यांनी स्टेथोस्कोप हातात घेत उजेला यांना आवश्यक उपचार दिले. राज्यपाल व्यवसायाने डॉक्टर आहेत.

उजेला पुढं म्हणाले की, जेव्हा गव्हर्नर मॅडम यांनी माझ्या हृदयाचे ठोके मोजले, तेव्हा ते 39 होते. त्यांनी मला समोर वाकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे माझा श्वास स्थिर झाला. हैदराबादमध्ये उतरल्यानंतर ते थेट रुग्णालयात गेले जेथे त्यांच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. उजेला यांच्या प्लेटलेटची संख्या 14,000 वर आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com