esakal | नाशिक - मुंबई महामार्गाने प्रवास करताय?; वाहनचालकांची केवळ फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai-nashik-highway

मुंबई-नाशिक महामार्गाने प्रवास करणार असाल तर बातमी तुमच्यासाठी

sakal_logo
By
पोपट गवांदे

घोटी (जि.नाशिक) : दर वर्षी मुंबई-नाशिक महामार्गावर टोलच्या स्वरूपात मोठा कर आकारला जातो. यातून चांगले रस्ते, दुभाजक यांची कामे करणे गरजेचे असते. मात्र नाशिक-मुंबई महामार्गावर रस्त्याची वस्तुस्थिती वेगळीच असते. त्यामुळे वाहनचालकांकडून केवळ कर वसूल करत त्यांची फसवणूक केली जाते. मुंबई-नाशिक महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे महिनाभरापूर्वी केलेले डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाले आहे. यातच पावसामुळे डांबरीकरण झालेल्या भागातील खडी व रेती पूर्णपणे वेगळी झाली आहे. (potholes-on-Mumbai-Nashik-highway-marathi-news)

निकृष्ट डांबरीकरण; पावसामुळे खडी, रेती बाजूला

दर वर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांनी वाहनचालकांचे स्वागत करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी कमी करून अपघात कमी करण्याच्या उद्देशाने शहापूर ते गोंदे एकेरी महामार्गाचे चौपदरीकरण व पुढे गोंदेपासून रस्ता सहापदरी होत आहे. या वेळी मुंढेगाव ते कसारा घाट (थळमाथा) पर्यंत जागोजागी रस्त्याचे काम सुरू असतानाच महिनाभरापूर्वीच केलेले डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाल्याचे रिमझिम पावसामुळे दिसून आले. केवळ रिमझिम पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून, रस्त्यावरील खडी व रेती बाजूला गेली आहे. यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होऊ लागले आहेत. यातच रस्त्याचे डांबरीकरण दुभाजकाच्या उंचीचे केल्याने व नियंत्रणरेषा पुसल्या गेल्याने भरधाव जाणारी वाहने थेट दुभाजक ओलांडून जात आहेत.

साइडपट्ट्यांची वाताहत, हायमस्ट बंद

महामार्गावरील साइडपट्ट्यांची वाताहत झालेली आहे. यातच रस्त्यांच्या मध्यभागी जागोजागी हायमास्ट उभे केले आहेत. मात्र यातील अनेक हायमस्ट बंद असल्याने ठिकठिकाणी अंधाराचे साम्राज्य आहे. -

हेही वाचा: नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसच्या सुरक्षेला छेद; 5 लाख गायब

हेही वाचा: मंत्रीपद मिळूनही डॉ. भारती पवारांचा सोज्वळपणा कायम

loading image