
नाशिक-पुणे महामार्गावर जीवघेणे खड्डे; प्रवासी त्रस्त
नाशिक रोड : कमी पावसातही नाशिक- पुणे महामार्गावरील सिन्नर फाटा ते सिन्नरपर्यंत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. मात्र, असे असूनही शिंदे टोल नाका प्रशासनाकडून टोल वसुली मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेकडे राष्ट्रीय महामार्ग व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. प्रवास करताना सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. रस्त्यावर या अगोदर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
नाशिक- पुणे महामार्गावर सिन्नर फाटा ते सिन्नरपर्यंत २३ किलोमीटरच्या अंतराच्या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहे. अनेकांचा जीव गेला असतानाही सिन्नर टोलवेज कंपनी व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. दोन दिवसांपूर्वी पळसे येथे गतिरोधकावर आढळून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असताना टोल प्रशासन मनमानी मोठी वसुली करत आहे. लोकप्रतिनिधींचे ऐकत नाही. यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे.लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून कधी तरी थोड्याफार प्रमाणात काम करून त्यांचे समाधान केले जाते. मात्र, वाहनधारक रस्त्यावरील खड्डे कधी दुरुस्त होणार असा सवाल उपस्थित करत आहे. टोल प्रशासन टोल वसुली थांबावी, अशी मागणी वाहनधारक, नागरिक करत आहे. अन्यथा नागरिकांच्या रोष सामोरे जावे लागले, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहे.
नाशिक- पुणे महामार्गावर अनेक दिवसांपासून खड्डे पडले आहे. अनेकांचे जीव जात आहे. टोल प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही ऐकत नाही.
- विशाल सांगळे, नागरिक.
हेही वाचा: अवघ्या २० रुपयांसाठी मजुराची गळा चिरून हत्या; नाशिकमधील प्रकार