Nashik : खड्ड्यांमुळे वाहनधारकांच्या संयमाचा अंत

Potholes on the road
Potholes on the roadesakal
Updated on

नाशिक : कोट्यवधी रुपये खर्च करूनही खड्ड्यांमुळे मान- पाठ एक झालेल्या वाहनधारकांच्या संयमाचा अंत महापालिका पाहत असून खड्ड्यात रस्ते की रस्त्यांवर खड्डे अशी स्थिती असताना दुरुस्ती करणे सोडून दिवाळी सणाची वाट पाहत आहे.

दिवाळीत रस्ते दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेण्याचे नियोजन असले तरी ऑक्टोबर महिन्यापर्यंत रस्त्यांवरील खड्डे चुकविताना नाशिककरांची हाडे खिळखिळी होणार आहे. त्यामुळे बघ्यांची भूमिकाच न घेता तातडीने रस्ते दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेण्याची मागणी होत आहे. (Potholes put an end to motorist patience Nashik Latest Marathi News)

शहरात गेल्या दोन ते अडीच वर्षात जवळपास साडेसहाशे कोटी रुपये रस्त्यांवर खर्च करण्यात आले. नवीन नगरे, कॉलन्यांमध्ये जेथे रस्ते नाही तेथे खडीचे, जेथे खडीकरण झाले आहे. तेथे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले.

त्यामुळे शहरात रस्त्यांची लांबी अठराशे वरून दोन हजार किलोमीटरपर्यंत पोचली. नवीन रस्ते तयार करताना अनेक भागात रस्त्यांवर फक्त डांबर फासण्यात आले, तर काही भागात लेअर गायब होऊन ठेकेदारांची देयके काढण्यात आल्याच्या तक्रारी आहे.

जानेवारी ते मार्च महिन्यात रस्त्यांची कामे झाल्यानंतर गुळगुळीत रस्त्यांचे शहर म्हणून नाशिकचे नाव घेतले जाऊ लागले. परंतु, पावसाळ्यात रस्त्याच्या गुणवत्तेचे पितळ उघडे पडले. अनेक भागात रस्ते खड्ड्यात गेले.

रस्ता तयार केल्यानंतर तीन वर्षे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर आहे. परंतु, खड्डे पडल्यानंतर ठेकेदार गायब झाले, तर महापालिकेच्या अभियंत्यांना ते ठेकेदार सापडत नाही. चौदा ठेकेदारांना नोटिसा बजावण्याचा सोपस्कार पार पाडला, परंतु कारवाई मात्र शून्य आहे. एकंदरीत ‘आंधळं दळतय’ अशी अवस्था शहराची आहे.

Potholes on the road
स्वातंत्र्यदिनापासून स्टार्टअप यात्रा; युवकांसाठी 1 लाखापर्यंतची पारितोषिके

खर्चाचा असाही भार

घरपट्टीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक महापालिकेला कर अदा करतात. या कराच्या माध्यमातून प्रत्येक कामात आर्थिक सहभाग नोंदविला जातो. त्यामुळे नागरिकांच्या कररूपी निधी खर्च करताना जबाबदारीने खर्च करणे आवश्‍यक असते.

त्याचबरोबर कामाची गुणवत्ता टिकविण्याची जबाबदारीदेखील महापालिकेची असते. परंतु, रस्त्यांवर अवाजवी खर्च करताना गुणवत्तादेखील राखली जात नाही, वांरवार त्याच कामावर खर्च होत असल्याने एकाच विषयावर खर्च होऊन दुप्पट खर्चाचा भार सहन करावा लागतो.

कररूपी पैसा वाया तर जातोच, त्याशिवाय दुचाकी-चारचाकी वाहने नादुरुस्त होत असल्याने खर्च वाढतो. तर, खड्ड्यांमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्याने त्यावर वेगळा खर्च करावा लागतो.

Potholes on the road
पौरोहित्‍यातही महिलाराज : मंत्रोच्चारामुळे सत्तरीतही त्यांचा उत्‍साह कायम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com