पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत; तहसीलदारांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Poultry commercial issue statement given to Tehsildar

पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत; तहसीलदारांना निवेदन

अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : राज्य शासनाने (state government) कुकुटपालन व्यवसायाला शेतीशी निगडित शेतीपूरक व्यावसाय म्हणून निवडले आहे. तरीही या व्यावसायला ग्रामीण भागातील ग्रामपंचायती कर आकारणी करतात. वीस वर्षांपासून खासगी पोल्ट्री कंपन्यांकडून पक्षी संगोपन खर्चात कुठलीही ठोस दरवाढ न झाल्याने राज्यातील आठ लाख पोल्ट्री (Poultry) व्यावसायिक अडचणीत आहेत. राज्यातील खाजगी पोल्ट्री कंपन्यांकडून पशुसंवर्धन विभागाने कुकुटपालन करणाऱ्या शेतक-यांच्या मागण्या सोडवून कुक्कुटपालन व्यवासायाला हमीभाव जाहीर करावा आदी मागण्यांसाठी इगतपुरी तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना नुकतेच निवेदन दिले.

खासगी कंपन्यांकडून पोल्ट्री व्यावसायिकांची पिळवणूक होत आहे. पक्षी वेळेवर दिले जात नाहीत. अनेक वर्षांपासून पक्षी संगोपन खर्चातही वाढ न झाल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. तुस, खाद्य, वीजबिल, मजुरी व व्यवस्थापन खर्च वाढल्याने कुक्कुटपालक शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्चवजा काहीच येत नाही. खासगी कंपन्या शेतकऱ्यांच्या पेमेंटमधून कंपनी व्यवस्थापन खर्च कपात करतात. कधी कधी पन्नास किलोच्या बॅगेत दीड ते दोन किलो खाद्य कमी निघते. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, दिंडोरी, पेठ, चांदवड, त्र्यंबकेश्वर, नाशिक, कळवण, सटाणा, देवळा, सिन्नर, मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील पोल्ट्री व्यावसायिकांनी संबंधित तहसीलदारांना एकाच वेळी त्या त्या ठिकाणी निवेदन सादर करत धरणे आंदोलन केले.

या वेळी तहसीलदार कासुळे यांच्यासोबत पोल्ट्री प्रतिनिधची चर्चाही झाली. गटविकास अधिकारी लता गायकवाड यांना तत्काळ तालुक्यातील ग्रामपंचायती पोल्ट्री व्यावसायिकांकड़ून वाढवून कर आकरतात. त्यासंबंधी पोल्ट्री व्यावसायिकांची पिळवणूक थांबवा, असे आदेश दिले. दरम्यान जिल्हाधिकारी गंगाथरन डी. आणि पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी. आर. नरवाडे यांनाही निवेदन दिल्याचे जिल्हाध्यक्ष रोहिदास गायकर, गोटीराम जगताप, नवनाथ,पगार, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: मी भाजपमध्येच ! जयंतराव फूस लावतायेत

रोहिदास गायकर, कचरू डुकरे, वसंत भोसले, विक्रम पासलकर, प्रवीण आवारी, सुनील गाढवे, गोरख वाजे, यादव,सहाने, पप्पू पाटेकर, संदीप मालुंजकर, नवनाथ कर्पे, उमेश वाजे, सोमनाथ गायकर, समाधान सहाणे, बाळा पासलकर, सुरेश जाधव, सिद्धेश धोंगडे, दीपक गायकर, पंढरी भागडे, भाऊसाहेब नागरे, शैलेश चंद्रमोरे, गणेश राक्षे, स्नेहल हिरे, पोपट लहामगे, बाजीराव निमसे, अमोल बोराडे, कृष्णा पुंजारा आदी उपस्थित होते.

हेही वाचा: सप्तश्रृंगगड : किर्तीध्वजाच्या मिरवणूकीत खानदेशातून लोटला जनसागर

"पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. कुक्कुटपालन व्यवसाय शेती निगडित असल्याने ग्रामपंचायती कर कसा घेतात. वास्तविक कर भरण्याची आवश्यकता नाही. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचेकडे तत्काळ याबाबतची माहिती दिली जाईल तथापि राज्याच्या व जिल्ह्याच्या पोल्ट्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात बैठक घेऊन सखोल चर्चा केल्यास तत्काळ सर्व प्रश्न मार्गी लागतील."

-परमेश्वर कासुळे, तहसीलदार इगतपुरी

Web Title: Poultry Commercial Issue Statement Given To Tehsildar Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top