Mahavitaran
sakal
जुने नाशिक: महावितरणच्या नाशिक शहर विभाग दोनअंतर्गत ग्राहकांना योग्य दाबाचा आणि अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महापारेषणच्या १३२ केव्ही टाकळी सबस्टेशनमध्ये अत्यावश्यक दुरुस्तीचे काम शनिवारी दिवसभर सुरू होते. यामुळे द्वारका, जुने नाशिक, वडाळा गाव तसेच उपनगर ते नाशिक रोड अशा विविध भागांमध्ये तब्बल दहा तास वीजपुरवठा खंडित होता, त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.