Savitribai Phule Pune University
sakal
नाशिक: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता नवीन महाविद्यालये, अभ्यासक्रम, अतिरिक्त तुकड्या किंवा विषय मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत इच्छुक संस्थांनी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. एनसीपीएस ऑनलाइन प्रणालीद्वारे हे प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत.