Election
sakal
पोपट देवरे-जुने नाशिक: जनसंघापासून हिंदुत्ववादी विचारांना साथ देणाऱ्या या प्रभागात सन २०१७ च्या निवडणुकीत भाजपने एकतर्फी बाजी मारत पक्षाचे तिन्ही उमेदवार निवडून आणले. अर्थात, त्या वेळेस प्रभागात वर्चस्व असलेले माजी आमदार वसंत गिते यांचा प्रभाव असल्याने भाजपला मदत झाली; परंतु आता गिते यांच्या घरवापसीमुळे समीकरण बदलले आहे.