Politics
sakal
पंचवटी: परिसर महापालिका हद्दीत असला, तरी विशेषतः आडगाव, नांदूर व मानूर या ग्रामीण, मळे भागाचा प्रभाग दोनमध्ये समावेश होतो. महापालिकेची स्थापना झाल्यावर आडगावला शेतकरी कामगार पक्ष, नांदूर-मानूरला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा प्रभाव या मतदारसंघात होता. परंतु, भाजपने डाव्या विचारांच्या पक्षांना शह देत शिरकाव करीत चारही जागा जिंकल्या. अर्थात, त्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावावा लागला.