२०१७ च्या निवडणुकीत भाजपचे सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, राखीव जागेवर ॲड. श्याम बडोदे निवडून आले. परंतु अवघ्या दीड वर्षातच हद्दीवरून वाद झाले. वादाचे पर्यावसन वाहनांच्या तोडफोडीपर्यंत पोचले. कायदेशीररीत्या वाद मिटले, पण मनातील दुरावा कायम असल्याने पक्ष एकच असला तरी एकमेकांविरोधातच खेळी खेळल्या जातील, असे बोलले जात आहे.