Election
sakal
राजू अनमोला-सातपूर: महापालिकेच्या ३१ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक ९ हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानला जात आहे. या प्रभागात प्रामुख्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच लढत होईल असे सध्या तरी चित्र दिसत आहे. पक्ष म्हणून पॅनल एकमेकांसमोर लागणार असले तरी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील व माजी महापौर दशरथ पाटील यांच्यातील संघर्ष या प्रभागात दिसून येत आहे.