Agriculture
sakal
नाशिक: नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येते. रब्बी हंगाम २०२५-२६ करिता अधिकाधिक शेतकऱ्यांनी https://pmfby.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन पुणे येथील कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी केले आहे.