vehicle damage
sakal
जुने नाशिक: नानावली येथील प्रज्ञा नगर भागात सोमवारी (ता.८) मध्यरात्री कोयता आणि हत्यारे घेऊन टोळक्याने दहशत पसरविली. येथे उभ्या असलेल्या वाहनांची कोयते आणि दगडाने तोडफोड केली. यात पाच वाहनांचे नुकसान झाले असून, घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. सुभाष पाटील यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.