मालेगाव- माजी शिक्षण, ऊर्जा, आरोग्य आदी मंत्रिपदे भूषविणाऱ्या स्वर्गीय डॉ. बळिराम हिरे यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा लाभलेल्या प्रसाद हिरे यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठे बळ मिळणार आहे. या भागाच्या विकासालादेखील अधिक गती मिळेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.