Ramzan Festival | मालेगावी कपड्यांच्या खरेदीला पसंती

Prefer to buy clothes in Malegaon During Ramzan Festival Nashik News
Prefer to buy clothes in Malegaon During Ramzan Festival Nashik Newsesakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील यंत्रमाग कारखान्यात कॉटन, टेरिकोट, लुंगी, साडी, पांढरा कापडाचा माल तयार होतो. येथे दररोज अनेक कारखान्यातून लाखो मीटर कापड तयार होऊन बाहेर पडतो. शहराने कापड निर्मितीत वेगळी छाप निर्माण केली आहे. येथे कापड विक्रीची ५०० पेक्षा अधिक दुकाने आहे. शहरात स्वस्त कापड मिळतात, अशी वेगळी ओळख तयार झाल्याने शहरासह उत्तर महाराष्ट्रातील नागरिक येथील कापड खरेदीला पसंती देतात. रमजान महिन्यात (Ramzan Festival) लाखोंची उलाढाल होते.

शहरातील अनेक दुकानदार, हातगाडीवर विक्री करणाऱ्यांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. शहरातील बहुतेक नागरिक सामान्य, मध्यम वर्गीय व झोपडपट्टी वास्तव्य करणारे कामगार व अन्य घटक आहेत. दोन वर्षांपासून येथे कापड व्यवसायाला घर- घर लागली होती. यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक कपडे खरेदीसाठी बाहेर पडत आहे. मात्र, महागाईने कपड्यांना ग्रासले आहे. कपड्यांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ टक्के वाढ झाली आहे. येथील लल्ले चौक, गांधी मार्केट, आझाद नगर, इस्लामाबाद, हजार खोली, बेलबाग, राजानगर, आयशानगर, जमुहूर नगर, कुसुंबा रोड, किदवाई रोड, मोहम्मद अलीरोड, भिक्कु चौक, आदी ठिकाणी ५०० पेक्षा अधिक दुकाने आहे. याव्यतिरिक्त अनेक चौका चौकात २०० ते ३०० ठिकाणी हातगाडीवर कॉटनचे कपडे विक्री होतात. गरीब नागरिक प्रामुख्याने हातगाडीच्या कपड्यांना प्राधान्य देतात.

Prefer to buy clothes in Malegaon During Ramzan Festival Nashik News
Ramzan Festival | 100 टन मैद्या फस्त; मागणीत दुपटीने वाढ

रमजान महिन्यात येथील हातगाडी व कापड दुकानातून हजारो मिटर कापड विकला जात असल्याने लाखोंची उलाढाल होते. कापड विक्रीची लगबग शबे-बारात सणापासून सुरू होते. नवीन कपडे दुकानदार आणतात. कपड्यांमध्ये युवा वर्ग व सामान्य नागरिकांकडून प्रिंटेड वर्क, एम्ब्रॉईडरी, कुर्ता पायजामा, फॉर्मल शर्ट, डिजिटल प्रिंट व ज्येष्ठांकडून पांढऱ्या कपड्यांना पसंती दिली जाते. शहरात कपड्याचा माल मुंबई, अहमदाबाद, सुरत, भिवंडी, भिलवाडा आदी ठिकाणाहून विक्रीला येतो. स्वस्त व उत्तम दर्जाचे कपडे येथे मिळत असल्याने धुळे, नंदुरबार, नाशिक, येवला, मनमाड, चाळीसगाव, नांदगाव, सटाणा, देवळा, कळवण आदी भागातील नागरिक येथे खरेदीला येतात, असे सालीक ड्रेसेसचे संचालक तुफेल अन्सारी यांनी सांगितले.

Prefer to buy clothes in Malegaon During Ramzan Festival Nashik News
Ramzan | शिरखुर्माचा गोडवा वाढविणाऱ्या सुत्तरफेनीची मालेगावात हवा

दानशूरांकडून होणार गरिबांना कपड्यांचे वाटप

मुस्लिम धर्मात रमजान महिन्यात जकात वाटप केली जाते. गरीब व गरजूंना जकातच्या स्वरूपात कपडे वाटप करतात. तसेच, मशिदीमधील नमाज (Namaz) पढविणारे इमाम व अजाण देणारे मौज्जन यांनाही कपडे दिले जाते. त्यामुळे शहरात पांढऱ्या कपड्यांना मागणी वाढते. उमरासाठी जाणारे भाविक पांढरे कपडे आवर्जून खरेदी करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com