रामायण सर्किट ट्रेनचे नाशिकमध्ये होणार जंगी स्वागत

Ramayana Circuit Train
Ramayana Circuit TrainTwitter
Updated on

नाशिक रोड : भारतीय रेल्वे अर्थातच ‘आयआरसीटीसी’ने रविवार (ता. ७)पासून रामायण सर्किट ट्रेनला सुरवात केली आहे. ही ट्रेन अल्पावधीतच नाशिक शहरात दाखल होणार असून, या ट्रेनचे स्वागत करण्यासाठी श्रीराम भक्त जय्यत तयारी करीत आहेत.

रामायण सर्किट ट्रेनच्या माध्यमातून श्रीरामाशी निगडित वेगवेगळ्या धार्मिक स्थळांचे दर्शन भाविकांना एकाच फेरीत घेता येणार आहे. पर्यटनाचा हा पहिलाच प्रयोग होत आहे. राजधानी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वेस्थानकावरून ही रेल्वे रवाना झाली आहे. त्यानंतर अयोध्या ते रामेश्वरम असा जवळपास सात हजार ५०० किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे करणार असून, १७ दिवसांत प्रवास पूर्ण करण्याचे ध्येय आहे. यासाठी भारतातील श्रीराम भक्त कामाला लागले असून, नाशिक येथील पंचवटी वनवास स्थळाची पर्यटक पाहणी करायला येणार आहेत. पंचवटीमधील धार्मिक स्थळांना पर्यटक भेटी देणार आहेत. त्यामुळे नाशिक रोड रेल्वेस्थानकावर या ट्रेनचे जंगी स्वागत होणार आहे.

Ramayana Circuit Train
नाशिक जिल्‍ह्यात बससेवा पुन्‍हा ठप्प; कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र

असा असेल मार्ग

दिल्लीहून निघाल्यानंतर रामायण सर्किट ट्रेन सर्वांत अगोदर अयोध्येत दाखल होईल. तेथे श्रीराम जन्मभूमी मंदिर, श्री हनुमान मंदिर आणि भरत मंदिराचे दर्शन भाविकांना घेता येईल. त्यानंतर ही रेल्वे सीतामढीकडे जाईल. तेथे जानकी जन्म स्थान आणि राम मंदिराचे दर्शन घेता येईल. तेथून पुढे ही रेल्वे काशी, चित्रकूट आणि नाशिकला पोहोचेल. या ठिकाणी पंचवटी वनवास स्थळ व अन्य धार्मिक स्थळांना पर्यटक भेटी देतील. नाशिकहून निघाल्यावर प्रवास करत कर्नाटकातील हम्पीत दाखल होईल. या प्रवासाचा शेवट रामेश्वरम्‌ स्थानकावर होईल. तेथून ही रेल्वे पुन्हा राजधानी दिल्लीकडे रवाना होईल.

Ramayana Circuit Train
Nashik | मालेगावात बंदुकीचा धाक दाखवून दरोडा! सहा जण गजाआड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com