नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे २०२६-२७ मध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कामांचा प्राधान्यक्रम ठरविताना त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करावा. तसेच येत्या पंधरा दिवसांमध्ये हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे सादर करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्र्यंबकेश्वर पालिकेला केल्या आहेत.