Nashik : राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ‘गांधी आणि आंबेडकर’ चे सादरीकरण

Amateur Marathi Drama Competition
Amateur Marathi Drama Competitionesakal

नाशिक : ख्यातनाम नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी यांच्या दमदार संहितेला सादरीकरणाच्या माध्यमातून न्याय देण्याचा पुरेपुर प्रयत्न शनिवारी (ता. १९) एस. एम. एज्युकेशन सोसायटीच्या संघाने केली.

कलावंतांनी अत्यंत ताकदीने उभे केलेले हे दोन अंकी नाटक प्रेक्षकांना भावलेही. मात्र, दमदार संहितेच्या माध्यमातून हाताळलेल्या संवेदनशील विषयाचे दडपण चोखंदळ नाट्य रसिकांपासून लपू शकले नाही. असे असले तरी, या नाटकामुळेच आता खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरवात झाल्याचा ‘फील’ नक्कीच आला.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कला संचालनालयातर्फे सुरू असलेल्या ६१ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील तिसरे नाटक शनिवारी सादर झाले. श्री. गज्वी यांच्या ‘गांधी आणि आंबेडकर’ या नाटकाविषयी राज्यभरातील प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. खरेतर हा संवेदनशील विषय हाताळणे तितकेसे सोपे नाही.(Presentation of Gandhi and Ambedkar in State Amateur Marathi Drama Competition Attempt to do justice to a sensitive subject Nashik News)

Amateur Marathi Drama Competition
Nashik Sports News : ‘भारत- अ’ विरुद्ध अंतिम सामन्‍यात ईश्‍वरी सावकार च्‍या सर्वाधिक धावा

त्यामुळे एक स्वाभाविक दडपण आणि अनाहूत भीती हे नाटक सादर करताना अनेकवेळा बघावयास मिळते, याचीच प्रचिती या वेळीही आली. भरत कुलकर्णी दिग्दर्शित या नाटकात म. गांधी यांची भूमिका गजानन चोपडे यांनी, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका रोहित पगारे यांनी साकारली.

विशेष म्हणजे अभिनयात कसलेल्या या दोन्हीही कलाकारांना तितकीच दमदार देण्यासाठी विदूषकाच्या भूमिकेलाही भूषण गायकवाड यांनी पुरेपुर न्याय दिला. स्वत: दिग्दर्शक श्री. कुळकर्णी यांनीच पार्श्‍वसंगीताची बाजूही सांभाळली, तर नाटकाला साजेसे नेपथ्य करण टिळे यांनी उभे केले. त्यांना रवींद्र राहाणे यांच्या प्रकाश योजनेने किरकोळ अपवाद वगळता उत्तम साथ दिली.

माणिक कानडे यांनीदेखील रंगभूषा व वेशभुषेची जबाबदारी सक्षमपणे निभावली. त्यामुळे अगदी सुरवातीला पडदा उघडण्यापूर्वीच विदुषकाच्या संवादांपासूनच प्रेक्षकांच्या मनाची पकड घेणाऱ्या या नाटकाच्या दोन्हीही अंकांनी सर्वांना पूर्णवेळ खिळवून ठेवले. वास्तविक पहिला अंक नियोजित वेळेपेक्षा किंचित लांबला असला, तरी कंटाळवाणा मात्र झाला नाही.

Amateur Marathi Drama Competition
School Nutrition Diet : शालेय पोषण आहार पुरविण्यासाठी 11 ठेकेदार पात्र

एकूणच दमदार संहितेच्या सादरीकरणात संघ कुठेही कमी पडू नये, याची पुरेपुर काळजी सर्वांनी घेतल्याचे नाटक पाहताना पदोपदी जाणवत होते आणि या नाटकाला स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी मोर्चेबांधणी करण्यातही संघाला यश आले. त्यामुळे प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद या नाटकाला मिळाला.

आजचे नाटक

स्पर्धेत रविवारी (ता. २०) सायंकाळी सातला राजेंद्र पोळ लिखित ‘इथर’ हे बहुचर्चित नाटक सादर होणार आहे. सिडको येथील श्री. शिवछत्रपती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे सादर होणाऱ्या या नाटकाचे दिग्दर्शन चंद्रवदन दीक्षित यांनी केले आहे.

Amateur Marathi Drama Competition
Nashik : महाबळेश्वर पेक्षाही नाशिक थंड; पारा 10.4 अंशावर - दिवसभर हवेत होता गारवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com