President Police Medal : नाशिक ग्रामीण पोलीस दलातील आहेर, देवरे यांना राष्ट्रपती पोलीस पदक

राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस सहायक उपनिरीक्षकांचाही समावेश आहे.
Pramod Aher & Vinay Devre
Pramod Aher & Vinay Devreesakal

नाशिक : केंद्रीय गृहविभागाकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस सहायक उपनिरीक्षकांचाही समावेश आहे.

प्रमोद आहेर, विनय देवरे असे पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. (President Police Medal to aher devre To Rural Police Force nashik news)

प्रमोद आहेर हे १९८९ मध्ये नाशिक पोलीस दलामध्ये शिपाई या पदावर भरती झाले होते. ३४ वर्षांच्या पोलीस सेवाकाळामध्ये आहेर यांना २४२ रिवॉर्डस्‌ मिळाले आहेत. तसेच, २०१७ मध्ये पोलीस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आलेले आहे.

मूळचे देवळा येथील रहिवाशी असलेले आहेर यांनी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हेशाखा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सटाणा, वाडिवर्हे, येवला, ॲण्टी ह्युमन सेलमध्ये सेवा बजावली आहे.

सध्या ते सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर ओझर येथील विमानतळ सुरक्षा विभागात कार्यरत आहेत.

Pramod Aher & Vinay Devre
President Police Medal: सोनवणे, उगले, काकड, संधान यांना ‘राष्ट्रपती’ पोलीस पदक! प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर

त्याचप्रमाणे, विनय देवरे यांनाही पोलीस पदक जाहीर झाले आहे. देवरे हे १९८८ मध्ये पोलिस दलात शिपाई म्हणून भरती झाले होते.

मूळचे वीरगाव (ता. सटाणा) येथील असलेले देवरे यांनी ३५ वर्षात अंबड, मालेगाव, कळवण, नांदगाव, जायखेडा येथे सेवा बजावली असून, सध्या ते सहायक उपनिरीक्षक म्हणून देवळा येथे कार्यरत आहेत.

त्यांना १५६ रिवॉर्डस्‌ मिळाले असून २०१८ मध्ये त्यांना पोलीस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आलेेले आहे.

Pramod Aher & Vinay Devre
Nashik Police Promotion: आयुक्तालयातील 12 अंमलदारांची पदोन्नती! पोलीस आयुक्तांचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com