Press Workers
sakal
नाशिक रोड: भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयांच्या महामंडळाने अधिकारी व कामगार विरोधी धोरण राबविण्याचा प्रयत्न सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रेस मजदूर संघाच्या वतीने तातडीची विशेष सभा घेण्यात आली. सभेत संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे उपस्थित राहून कामगारांना धोरणाची सविस्तर माहिती दिली. कामगारांनी हात वर करून पुढील लढ्यासाठी संघावर संपूर्ण विश्वास दर्शविला. सभेत उपस्थित कामगारांनी एकजुटीची घोषणाही केली आणि ठामपणे या धोरणांविरोधात लढा उभारण्याचे आवाहन स्वीकारले.