Laborers grading the crop in tomato grower Ravindra Ahire's field
Laborers grading the crop in tomato grower Ravindra Ahire's fieldesakal

Tomato Price Fall : भाव घसरल्याने टोमॅटोची लाली उतरली; उत्पादकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ

Tomato Price Fall : कांदा पाठोपाठ आता टोमॅटोचे भाव घसरल्याने उत्पादकांनी केलेला खर्च वसूल होईना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे टोमॅटोची लाली बाजारात फिकी पडली आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणींचा डोंगर तयार झाला आहे. (price of tomatoes fell due to fall Time to become indebted to producers nashik news)

यंदा मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाल्याने उत्पादकांना भाव मिळणे दुरापास्त आहे. या विचाराने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड स्थगिती देऊन टोमॅटो पिकास पसंती देऊन या पिकास भाव राहील या अपेक्षेने लागवड झाली.

परंतु ऐन काढणीच्या वेळी टोमॅटोची लाली फिकी झाली. त्यामुळे केलेला खर्च वसूल होईना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन उन्हाळी हंगामात येणारा टोमॅटो आता कवडीमोल भावाने विक्री होत आहे.

मार्केटयार्ड मध्ये दोन ते तीन दिवस मालाची विक्री होत नाही. अशी अवस्था या पिकाची झाली आहे. आता नेमके कोणते पीक घ्यावे या काळजीत शेतकरी आहे.

यंदाचे वर्ष हे अवकाळीत जात असून पिकांचे नुकसान होत आहे, टोमॅटो एकरातील ५० हजार खर्च येतो. माल भरपूर निघतो. परंतु भाव नसल्यामुळे शेतकरी काळजीत सापडला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Laborers grading the crop in tomato grower Ravindra Ahire's field
Pollution: मानवी हस्तक्षेपामुळे दारणेचे पावित्र्य धोक्यात! औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याने जैवविविधता नष्ट

उन्हाळ्यात भाव राहतो या अपेक्षेने विरागी, १०५७, नामधारी, वैशाली या जातीची मल्चिंग पेपरवर इनलाईन टोमॅटोची लागवड केली होती. यंदा कोणत्याच पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

टोमॅटोचा खर्च

२० किलो कॅरेट वाहतूक खर्च ७० रुपये

तोडणी एका कॅरेटचे १५ रुपये

टोमॅटो प्रतवारी खर्च मजुरी ६०० रुपये (१०० कॅरेटसाठी)

सध्या बाजारभाव २० किलोसाठी ८० ते १०० रुपये

२० किलो कॅरेटसाठी खर्च ९० ते ९५ रुपये

"उन्हाळी हंगामातील टोमॅटो पिकास भाव निश्चित राहतो. यानुसार लागवड केली. परंतु सध्या मिळणाऱ्या भावातून केलेला खर्च वसूल होईना अशी परिस्थिती आहे. "

- रवींद्र अहिरे टोमॅटो उत्पादक, केरसाणे, ता. बागलाण

Laborers grading the crop in tomato grower Ravindra Ahire's field
Onion Rate : 2 महिन्यानंतर कांद्याचा भाव वधारणार? शेतकऱ्यांना आशा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com