Onion Rate : 2 महिन्यानंतर कांद्याचा भाव वधारणार? शेतकऱ्यांना आशा

onion rate
onion rateesakal

Onion Rate : बेमोसमी पाऊस, गारपीट व उत्पादनात झालेल्या वाढीमुळे गेल्या तीन महिन्यापासून कांद्याला पुरेसा भाव मिळाला नाही. किरकोळ अपवाद वगळता बहुतांशी कांदा ४०० ते ७०० रुपये दरम्यान विकला गेला.

कसमादेत या वर्षी उन्हाळी कांद्याचे जम्बो उत्पादन घेण्यात आले. बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे जवळपास तीस टक्के कांद्याचे नुकसान झाले. पावसाच्या भीतीने मिळेल त्या भावात शेतकऱ्यांनी २० टक्के कांदा विक्री केला.

अजूनही जेमतेम ५० टक्के कांदा चाळींमध्ये शिल्लक आहे. बदललेल्या वातावरणात काही ठिकाणी चालींमध्येच कांदा सडू लागला आहे. मात्र या सर्वात जुलै- ऑगस्टमध्ये कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर वधारले जातील. यातून भाव वाढण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. (Will price of onion increase after 2 months Hope for farmers nashik news)

यावर्षी पावसाळ्यात मुबलक पाऊस झाला. परतीचा देखील चांगला पाऊस झाला. तलाव, पाझर तलाव, नद्या, नाले, शेततळे, विहिरी, धरणे ओव्हर फ्लो झाली.

गेल्या वर्षी कांद्याला मिळालेला भाव व या वर्षी उपलब्ध असलेले पाणी यामुळे संपुर्ण कसमादे पट्ट्यात उन्हाळी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होती. महागळे उळे व जादा मजुरी देऊन शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली.

यावर्षी विक्रमी उत्पादन अपेक्षित होते. शेतकऱ्यांच्या या अपेक्षेवर बेमोसमी पावसाने पाणी फिरविले. उन्हाळी कांद्याचे उत्पादन दृष्टीक्षेपात आल्यापासून बेमोसमी पाऊस व गारपीट शेतकऱ्यांची पाट सोडायला तयार नाही.

विशेषतः बागलाण तालुक्यात गारपिटीमुळे कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले. पाऊस व गारपिटीने कांदा शेतातच भिजला. पाणी लागलेला कांदा शेतकऱ्यांनी मिळेल त्या किमतीत विकला.

मे महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी देखील पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने या वर्षी उन्हाळी कांद्याच्या एकूण उत्पादनातील किमान ३० टक्के कांद्याचे नुकसान झाले आहे.

आगाऊ व पाऊस नसलेल्या काळात काढलेला कांदा शेतकऱ्यांनी चाळींमध्ये भरून ठेवला आहे. काही शेतकऱ्यांनी तर पावसात भिजलेला कांदाही चांगला भाव मिळेल या अपेक्षेने राखून ठेवला आहे. सध्या पहाटे थंडी, दुपारी ऊन तर सायंकाळी पाऊस असे विचित्र वातावरण आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

onion rate
Pimpalgaon Bazar Samiti : पिंपळगाव बाजार समितीच्या उपसभापतिपदासाठी मोर्चेबांधणी; प्रशासकीय राजवट संपणार

या वातावरणाचा फटका चाळींमध्ये साठविलेल्या कांद्यावर होवू लागला आहे. काही ठिकाणी तोतीजवळ कांदा सडू लागला आहे. जुलै- ऑगस्टमध्ये आवक घटून कांद्याचे भाव वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

ऑगस्टनंतर कांदा बाजार तेजीत राहण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. दसऱ्यापासून कर्नाटक व इतर भागातील तसेच दिवाळीनंतर खानदेशमधील लाल कांदा बाजारात येतो. उन्हाळी कांदा संदर्भात शेतकऱ्यांना जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यात चांगला भाव मिळेल अशी शाश्‍वती आहे.

"नाफेडने दोन हजार रुपये प्रतिक्विंटल आधारभूत किंमत ठेवून कांदा खरेदी केला पाहिजे. जुलै- ऑगस्टमध्ये आवक कमी होऊन भाव वाढू शकतील. ज्यावेळी भाव वाढतील त्यावेळी बहुसंख्य शेतकऱ्यांना कांदा शिल्लक नसेल. कांद्याबाबत राज्य शासनाने ठोस धोरण आखले पाहिजे. कांदा निर्यातीला चालना दिली पाहिजे." - सजन पवार, शेतकरी, रावळगाव

"आजच्या घडीला बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे उन्हाळी कांद्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे. राज्य व केंद्र शासनाने एकत्रितपणे जास्तीत जास्त कांदा निर्यात करण्याबाबत धोरण आखले पाहिजे. नाफेडने किमान हमी भावाने जास्तीत जास्त कांदा खरेदी करावा. जेणेकरून कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल." - कुबेर जाधव, शेतकरी नेते

onion rate
Pollution: मानवी हस्तक्षेपामुळे दारणेचे पावित्र्य धोक्यात! औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याने जैवविविधता नष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com