‘विदेशी’ पेक्षा ‘देशी’ दारूचे दर वाढले? राज्य उत्पादनाचा ‘हात’भार!

liquor
liquoresakal

नाशिक : नाशिक जिल्ह्यात वाइन शॉप (wine shop) आणि सरकार मान्य देशी दारू दुकानात चढ्या भावाने दारू विक्री सुरू असल्याबाबत ‘सकाळ’ने आवाज उठवताच राज्य उत्पादन शुल्क विभागाची (State Excise Department) यंत्रणा खडबडून जागी झाली. मात्र, असा प्रकार सुरूच नाही, अशा आविर्भावात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भूमिका घेत एकप्रकारे चढ्या भावाने दारू विक्रीला अप्रत्यक्षपणे हातभार असल्याचेच दाखवून दिले.

‘देशी’ त कोणते पाणी मुरते?

नाशिक जिल्ह्यात वाइन शॉप आणि सरकार मान्य देशी दारू दुकानात चढ्या भावाने दारू विक्री सुरू असल्याबाबत ‘सकाळ’ने मंगळवार (ता. ३०)च्या अंकात वृत प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांनी मूळ किमतीला दारू विक्री केली. मात्र, काही मुजोर व्यावसायिकांनी ‘घ्यायची असेल तर घ्या’, असे म्हणून ग्राहकांना टोलवून लावले. विशेष म्हणजे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि उपाधीक्षक यांनी अद्यापही याप्रश्नी लक्ष घातलेले नाही. त्यामुळे ‘देशी’ त कोणते पाणी मुरते, याबद्दल सामान्य नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत.

‘विदेशी’ पेक्षाही ‘देशी’चे अचानक इतके दर का वाढले?

नाशिक जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणची माहिती घेतली असता, अनेक व्यावसायिक मूळ किंमत ६० रुपयांऐवजी ७० ते ७२ रुपये दरानेच दारू विक्री करताना आढळून आले. सटाणा येथे वाइन शॉपमध्ये ६५, तर सरकार मान्य देशी दारू दुकानात ७० रुपये दर आजही होता. कळवण, देवळा आणि मालेगावातही हीच परिस्थिती होती. इगतपुरी येथे मात्र मूळ किमतीत देशी दारूची विक्री सुरू आहे. सिन्नर, येवला, निफाड, दिंडोरी तालुक्यांतही मूळ किमतीपेक्षा अधिक दराने विक्री सुरू होती. त्यामुळे ‘विदेशी’ पेक्षाही ‘देशी’चे अचानक इतके दर का वाढले, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.

liquor
ममता बॅनर्जी-शरद पवार भेट; नवाब मलिकांनी दिली महत्त्वाची माहिती

अधीक्षक म्हणतात ‘बघतो बघतो’!

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांना याबाबत विचारले असता, आपल्याला याबाबत काहीही माहीत नाही, परंतु याप्रश्नी आपण ‘बघतो बघतो’ अशीच भूमिका घेतली. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशी दारू विक्रेत्यांनी राज्य उत्पादन शुल्कच्या नाकावर टिच्चून ‘युनियन’ केल्याची चर्चा ऐकायला मिळाली. याबाबत उपाधीक्षक बाबासाहेब भुतकर यांनी, अशी युनियन करण्याचा व्यावसायिकांना अधिकारच नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

आजही आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकाराबद्दल गंभीर भूमिका घेतली जाईल. - बाबासाहेब एन. भुतकर, उपाधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिक

liquor
महागाईचा फटका! एलपीजी गॅस सिलिंडर 100 रुपयांनी महाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com